मुलींच्या लग्नाच्या वयात होणार बदल, ही असू शकते वयोमर्यादा

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुलींच्या लग्नासाठी किमान वयाचा फेरविचार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. समितीने अहवाल सादर केल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल.

नवी दिल्ली : भारत सरकार मुलींसाठी किमान लग्नाच्या वयात फेरबदल करीत आहे. आता मुलींच्या लग्नाचे किमान वय १८ वरून २१ केले जाऊ शकते. अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मुलींच्या जीवनात बरेच बदल घडून येतील.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुलींच्या लग्नासाठी किमान वयाचा फेरविचार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. समितीने अहवाल सादर केल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल.

मातृ मृत्यु दर कमी होण्यास फायदा 

मुलींची किमान वयोमर्यादा बदलण्याचे उद्दीष्ट म्हणजे मातृ मृत्यु दर कमी करणे आहे. सरकारच्या या अभ्यासामागे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असू शकतो, असा विश्वास आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले होते वक्तव्य 

शेवटच्या अर्थसंकल्पीय भाषणात असे म्हटले होते की स्त्रीने आई होण्यासाठी योग्य वयाबद्दल सल्ला देण्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात येईल. अर्थमंत्र्यांनतर आता पंतप्रधानांनी टास्क फोर्सच्या अहवालानंतर मुलींच्या विवाहाच्या किमान वयावर फेरविचार करणार असल्याचे सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सोडला होता सरकारवर हा निर्णय

तज्ज्ञांच्या मते ऑक्टोबर २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. मुलींना वैवाहिक बलात्कारापासून वाचवण्यासाठी बालविवाह पूर्णपणे बेकायदेशीर मानला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. लग्नासाठी कमीतकमी वयाचा निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर सोडले होते. असे म्हटले जात आहे की सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर सराव सुरू केला आहे.

लग्नासाठी मुलगी व मुलाचे किमान वय समान असले पाहिजे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. जर आई होण्यासाठी कायदेशीर वय २१ वर्षे निश्चित केले गेले असेल, तर एखाद्या महिलेची आपल्या मुलास जन्म देण्याची क्षमता ठराविक वर्षांत कमी होईल.