लॉकडाऊनच्या काळात सायकलवरून फिरत होते कलेक्टर..महिला कॉन्स्टेबलने अडवून  विचारले, ये कुठं निघालाय भाई.. आणि मग झाले असे काही की

गुलमंडी परिसरातील ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी निर्मला स्वामींनी टी-शर्ट परिधान केलेल्या आणि सायकलवरून फिरणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना ओळखलंच नाही आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता अडवून चौकशी केली.महिला कॉन्स्टेबलने जिल्हाधिकारी नकाते यांना विचारलं, तुम्ही कुठे जात आहात, घरीच रहा ना, भाई. तेवढ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मागून येणाऱ्या बंदूकधारक कर्मचारी म्हटला अहो मॅडम, कुणाला थांबवत आहात... हे सर आहेत.

    भीलवाडा : भीलवाडामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनची स्थिती तपासण्यासाठी स्व:त जिल्हाधिकारी शिवप्रसाद एम. नकाते हे सायकलवरून विना सरकारी ताफ्याशिवाय फिरत होते. मात्र त्यांनाच रस्त्यात एका महिला कॉन्स्टेबलनं अडवलं. कॉन्स्टेबल महिलेनं सायकलवर असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं ये कुठं निघालाय भाई? मास्कमुळे महिला कॉन्स्टेबल कलेक्टरला ओळखू शकल्या नाहीत. मात्र, त्यानंतर वस्तुस्थितीची माहिती झाल्यानंतर ती कॉन्स्टेबल महिला थोडीशी घाबरली, मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी उलट कॉन्स्टेबलच्या कामाचं कौतुक करत ‘वेरी गुड’ असे म्हणत तुम्ही नेहमी अशा पद्धतीनं सावध असायला हवं, असे म्हटले.

    जिल्हाधिकारी म्हणाले, मी डीएम आहे
    गुलमंडी परिसरातील ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी निर्मला स्वामींनी टी-शर्ट परिधान केलेल्या आणि सायकलवरून फिरणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना ओळखलंच नाही आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता अडवून चौकशी केली.महिला कॉन्स्टेबलने जिल्हाधिकारी नकाते यांना विचारलं, तुम्ही कुठे जात आहात, घरीच रहा ना, भाई. तेवढ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मागून येणाऱ्या बंदूकधारक कर्मचारी म्हटला अहो मॅडम, कुणाला थांबवत आहात… हे सर आहेत. तेवढ्यात जिल्हाधिकारीही सामान्यपणे म्हणाले की, मी डीएम आहे. या प्रकारामुळं काही वेळ महिला कॉन्स्टेबल घाबरून गेल्या. परंतु, जिल्हाधिकारी नकाते यांनी महिला कॉन्स्टेबलसोबत घडलेला हा प्रसंग अगदी सहजतेनं घेत, तिच्या कामाच्या तत्परतेचं कौतुक केले आणि त्यांनी पुढे विविध ठिकाणी जाऊन पोलिस कर्मचाऱ्यांची भेट घेत आढावा घेतला.

    या महिला कॉन्स्टेबलचे कौतुक होत असले तरी काही दिवसांपूर्वी त्यांना आणि त्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्या कोरोना नियम कटाक्षाने पाळण्याचा आग्रह करतात. कोरोनामुळे काय होतं ते मी आणि माझ्या कुटुंबानं पाहिलं आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सर्वांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं.