राफेल विमानांचा ताफा आज भारतीय हवाई दलात दाखल होणार

जुलैच्या (July) शेवटच्या आठवड्यात भारतात दाखल झालेल्या पाच राफेल विमानांचा ताफा गुरुवारी १० सप्टेंबर रोजी औपचारिकरित्या भारतीय हवाई दलात दाखल होईल. हवाई दलाला आज मोठी ताकद मिळणार असून अंबाला हवाई तळावर अधिकृतरित्या ही पाच विमाने कार्यरत होणार आहेत.

अंबाला: फ्रान्सहून जुलैच्या (July) शेवटच्या आठवड्यात भारतात दाखल झालेल्या पाच राफेल विमानांचा ताफा गुरुवारी १० सप्टेंबर रोजी औपचारिकरित्या भारतीय हवाई दलात दाखल होईल. हवाई दलाला आज मोठी ताकद मिळणार असून अंबाला हवाई तळावर अधिकृतरित्या ही पाच विमाने कार्यरत होणार आहेत.

भारतासाठी आणि हवाई दलासाठी हा क्षण खूप महत्वाचा असणार आहे. यासाठी मोठमोठे अधिकारी आणि मंत्री अंबाला विमानतळावर पोहोचणार आहेत. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह  (Rajnath Singh) , फ्रान्सचे सशस्त्र सैन्याचे मंत्री फ्लोरेंन्स पार्ले (French defence minister Florence Parly) देखील सहभागी होणार आहेत. दोन्ही नेते प्रमुख पाहुणे असणार आहेत. राफेल विमाने २७ जुलैरोजी भारतात आली होती. यानंतर इथे त्यांची चाचणी घेण्यात आली. आता ही पाच लढाऊ

विमाने हवाई दलाच्या १७ वी स्क्वाड्रन ‘गोल्डन अॅरोज’ चा भाग बनणार आहेत. या प्रसंगी फ्रान्सच्या संरक्षण क्षेत्राचे एक मोठे प्रतिनिधी मंडळही भारतात येत आहे. राफेल विमानांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही विमानं त्यांच्या एकूण वजनापेक्षा दीडपट जास्त वजनाची शस्त्र सहज वाहून नेतात. एकाचवेळी अनेक लक्ष्यांवर सहज अचूक हल्ला करण्याची क्षमता या विमानांमध्ये आहे. ही विमानं हवाई दलात दाखल झाल्यामुळे भारताच्या क्षमतेत वाढ झाली आहे.