कोरोनाचे संकट संपेना! भारतातील पहिली कोरोना संक्रमित रुग्ण झाला पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह 

वुहानमध्ये मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेली ही विद्यार्थिनी सेमिनार सुट्टी साठी मायदेशी परतली होती. त्यावेळी तिची कोरोना टेस्ट पोझिटिव्ह आली होती आणि ती देशातील पहिली कोरोना संक्रमित बनली होती. तिच्यावर त्यावेळी त्रिसूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात तीन आठवडे उपचार केले गेले होते आणि दोन वेळा तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर तिला डिस्चार्ज दिला गेला होता.

    भारतात आढळून आलेला पहिला कोरोना रुग्णाला पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. केरळ येथील त्रिसूर येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही एक महिला रुग्ण असून,ती केरळ राज्यातली असून तिला पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.दिल्लीला शिक्षणासाठी जाण्यासाठी म्हणून या महिलेने आपली आरटीपीसीआर चाचणी केली. त्यात ही बाब निष्पन्न झाली आहे. सध्या तिच्या घरातच क्वॉरंटाइन असून, तंदुरुस्त आहे असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. ती वुहानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती.

    ३० जानेवारी २०२० मध्ये वुहानमध्ये मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेली ही विद्यार्थिनी सेमिनार सुट्टी साठी मायदेशी परतली होती. त्यावेळी तिची कोरोना टेस्ट पोझिटिव्ह आली होती आणि ती देशातील पहिली कोरोना संक्रमित बनली होती. तिच्यावर त्यावेळी त्रिसूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात तीन आठवडे उपचार केले गेले होते आणि दोन वेळा तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर तिला डिस्चार्ज दिला गेला होता. विशेष म्हणजे अद्यापीही या मुलीने कोरोना लस घेतलेली नाही असेही समजते.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जगभर कोरोनाची तिसरी लाट वेगाने येत असल्याचा इशारा दिला आहे. युके मध्ये दररोज ३४ हजार, रशियामध्ये २५ हजार, बांग्ला देशात १३ तर इंडोनेशियात पुन्हा दररोज ४० हजार नवे करोना रुग्ण सापडत आहेत.