दिलासादायक! देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ८७.३५ टक्क्यांवर, तर राज्याचा रिकव्हरी रेट काय?

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare ) दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ८ लाख ४ हजार ५२८ कोरोना रुग्णांवर (active cases) उपचार सुरू आहेत. तर ६४ लाख ५३ हजार ७८० रुग्णांना उपचारानंतर बरे झाले असून घरी सोडण्यात आलं आहे. तसेच आतापर्यंत १ लाख १२ हजार १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण गुरुवारी ८७.३५ टक्के झाले आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण रुग्णांच्या ११.११ टक्के आहे.

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत थोडीशी घट झालेली पाहायला मिळाली आहे. देशात गेल्या २४ तासात ६३ हजार ३७१ नवे कोरोना रुग्ण (new  cases) आढळले आहेत. तर ८९५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू (deaths ) झाला आहे. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ७४ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare ) दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ८ लाख ४ हजार ५२८ कोरोना रुग्णांवर (active cases) उपचार सुरू आहेत. तर ६४ लाख ५३ हजार ७८० रुग्णांना उपचारानंतर बरे झाले असून घरी सोडण्यात आलं आहे. तसेच आतापर्यंत १ लाख १२ हजार १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण गुरुवारी ८७.३५ टक्के झाले आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण रुग्णांच्या ११.११ टक्के आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १५ लाख ६४ हजार ६१५ वर पोहचली आहे. तर १३ हजार ७१४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८५.४ टक्क्यांवर पोहचला आहे.