देशातील कोविड-१९ चा मृत्यूदर १.७६ टक्के

देशातील कोविड-१९ चा मृत्यूदर १.७६ टक्के असून तो जागतिक स्तरावर सर्वात कमी आहे. जागतिक स्तरावर ३.३ टक्के इतका आहे. जागतिक स्तरावर मृत्यूची संख्या ही ११० दशलक्ष इतकी असून भारतात सर्वात कमी आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत ७५ हजारहून अधिक नवे रुग्ण आढळून येत होते. मात्र, १ सप्टेंबर रोजी ६ दिवसांनी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली, मात्र आज पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. गेल्या 24 तासांत देशात ७८ हजार ३५७ नवीन रुग्ण सापडले आहे. तर, १०४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

परंतु आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोविड-१९ चा मृत्यूदर १.७६ टक्के (India’s Case Fatality Rate (CFR) stands at 1.76%) असून तो जागतिक स्तरावर सर्वात कमी आहे. जागतिक स्तरावर ३.३ टक्के इतका आहे. जागतिक स्तरावर मृत्यूची संख्या ही ११० दशलक्ष (world while the global average is 110 deaths/million population) इतकी असून भारतात सर्वात कमी आहे. मात्र, ब्राझील, अमेरिका आणि युकेमध्ये कोरोना रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येत दुप्पट वाढ झाल्याचे दिसत आहे.

 संपूर्ण देशात आज बुधवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या २४ तासांत देशात ७८ हजारहून अधिक जणांना कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आले आहे. देशात गेल्या २४ तासांत ७८ हजार ३५७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, कोरोनामुळे १ हजार ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाल्याची स्थिती आहे.