congress leader tariq anwar advised to congress accept the truth on bihar assembly election 2020 defeat

सद्यस्थितीत अनावश्यक विधानांचे पेव फुटले असून त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्यही खच्ची होत आहे असेही त्यांनी नमूद केले. कार्यकर्त्यांमध्येही गटबाजी फोफावत असून माझ्याबाबतही पक्षाने कोणताही गैरसमज बाळगू नये असेही त्यांनी नमूद केले.

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क

देहरादून. काँग्रेस पक्षाचे ( Congress) सरचिटणीस आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत ( Harish Rawat) यांनी केलेल्या मागणीमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. राज्यात 2022 ( Uttrakhand election) मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणीच रावत यांनी केली. हरीश रावत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून ज्यात त्यांनी राज्याचे प्रभारी देवेंद्र यादव यांना धन्यवादही दिले आहेत. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी करतानाच विजय मिळाला तरी तोच व्यक्ती मुख्यमंत्री असेल हे सुद्धा पक्षाने जाहीर करावे असेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. ज्या व्यक्तीला काँग्रेस पक्ष मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करेल त्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहीन असेही त्यांनी नमूद केले आहे.

देवेंद्र यादव यांचे कौतुक

माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी राज्याचे प्रभारी देवेंद्र यादव यांचे आभारही मानले आहेत. हरीश रावतच काय प्र्त्येक नेता व कार्यकर्त्याविना 2022 ची लढाई लढणेच अशक्य आहे. पक्षाने आता कोणताही विलंब न करता 2022 च्या निवडणुकीचा सेनापती जाहीर करायला हवा असे त्यांनी नमूद केले. यासोबतच उत्तराखंड वैचारिकदृष्ट्या परिपक्व राज्य असून राज्याच्या विकासात मुख्यमंत्र्याची क्षमता व धोरणांचे मोठे योगदान असते याची राज्यातील जनतेलाही जाणीव आहे असेही त्यांनी नमूद केले. आगामी निवडणुकीत आपण अस्पष्ट धोरणासह पुढे गेलो तर ते पक्षासाठी सुखदत ठरणार नाही असेही त्यांनी नमूद केले.

गटबाजीवर टीकास्त्र

सद्यस्थितीत अनावश्यक विधानांचे पेव फुटले असून त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्यही खच्ची होत आहे असेही त्यांनी नमूद केले. कार्यकर्त्यांमध्येही गटबाजी फोफावत असून माझ्याबाबतही पक्षाने कोणताही गैरसमज बाळगू नये असेही त्यांनी नमूद केले. ज्या कोणाला पक्ष सेनापती जाहीर करेल त्याच्या पाठीशी उभा राहीन असे स्पष्ट करतानाच राज्यात काँग्रेसला अनुभवी व प्रभावी व्यक्तींची कमतरता नाही. कोणत्याही एका नावाची घोषणा करा व पुढे चला असे आवाहनही त्यांनी पक्षनेतृत्वाला केले आहे.