प्रेमात सारं काही माफ असतं ! ‘भाऊ’ म्हणून गर्लफ्रेंडच्या सासरी आला प्रियकर, लग्नघरातून २ दिवसातच नववधू बॉयफ्रेंडसोबत फरार

लग्नानंतर सुखी सहजीवनाचे स्वप्न घेऊन नवरदेव आपल्या नववधुला घेऊन घरी आला. लग्नघरात सर्वत्र धामधूम होती मात्र अचानक असं काही घडले की लग्नघरातील प्रत्येकजण धक्क्यात होते.

लग्नानंतर सुखी सहजीवनाचे स्वप्न घेऊन नवरदेव आपल्या नववधुला घेऊन घरी आला. लग्नघरात सर्वत्र धामधूम होती मात्र अचानक असं काही घडले की लग्नघरातील प्रत्येकजण धक्क्यात होते. लग्नाच्या धामधूमीत सारे कुटुंबीय व्यग्र असताना संधी साधत नववधू प्रियकरासोबत घरातून पळून गेली. यावेळेस लग्नात मिळालेले सारे सोन्याचे दागिने घेऊन या दोघांनी धूम ठोकली आहे.

म्हणतात ना प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं.. उत्तर प्रदेशच्या फिरोझाबादमध्ये एका प्रेमात बुडालेल्या तरूणाने नुकत्याच लग्न झालेल्या गर्लफ्रेंडच्या सासरी ‘भाऊ’ बनत प्रवेश केला. त्यानंतर पुढील २ दिवसातच नववधू तिच्या बॉयफ्रेंड सोबत पसार झाली आहे. घरात नववधू आणि तिचा भाऊ गायब असल्याचं घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली मात्र ते कुणालाच सापडले नाहीत. त्यानंतर वर पक्षाकडून वधूच्या घरच्यांना हा सारा प्रकार सांगितल्यानंतर ते देखील गावामध्ये हजर झाले.

२५ नोव्हेंबरला विवाह पार पडला. लग्नाचे विधी संपवून नववधू सासरी आली. लग्ना नंतरच्या विधींमध्ये प्रियकराने आपण वधूचा भाऊ असल्याचं सांगत प्रवेश मिळवला. त्यानंतर लग्नाच्या धामधूमीत सारे कुटुंबीय व्यग्र असताना संधी साधत नववधू प्रियकरासोबत घरातून पळून गेली. यावेळेस लग्नात मिळालेले सारे सोन्याचे दागिने घेऊन या दोघांनी धूम ठोकली आहे.एका मीडिया रिपोर्ट्स नुसार पळून गेलेल्या वधूच्या पतीने याबाबत पोलिस तक्रार केली आहे. वधूच्या आईने देखील एक स्वतंत्र तक्रार नोंदवली आहे.