चिल्ला सीमेवरील शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन मागे, दिल्ली-नोएडा सीमा वाहतुकीसाठी खुली

चिल्ला सीमेवरील (Agitation on the Chilla border)  शेतकऱ्यांचं धरण आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे दिल्ली-नोएडा सीमा देखील (Delhi-Noida border opened ) वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. जनतेला होणाऱ्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी सीमेवरून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नोएडा : केंद्र सरकारच्या (Central Government) नव्या कृषी कायद्याविरोधात (Opposition to new agricultural laws) उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. परंतु चिल्ला सीमेवरील (Agitation on the Chilla border)  शेतकऱ्यांचं धरण आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे दिल्ली-नोएडा सीमा देखील (Delhi-Noida border opened ) वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. जनतेला होणाऱ्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी सीमेवरून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकर्‍यांच्या सुरु असलेल्या आंदोलनामुळे गेल्या १८ दिवसांपासून बंद असलेली दिल्ली-नोएडा चिल्ला सीमा आता उघडण्यात आली आहे. चिल्ला सीमेवर धरणे आंदोलनाबाबत शेतकऱ्यांनी शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली. यावेळी मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चातून सहमती झाली. यानंतर वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्यात आला आहे.

राजनाथसिंह यांची घेतली भेट

शेतकऱ्यांच्या पाच सदस्य टीमने संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली असून त्यावेळी बैठकीत कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमरही उपस्थित होते. यावेळी संरक्षणमंत्र्यांसमोर १८ प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यातील मुख्य मागणी ‘शेतकरी आयोग स्थापन करण्याची आहे. त्याप्रमाणे मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आल्यामुळे आम्ही मार्ग मोकळा केला आहे, असं एका शेतकऱ्याने सांगितलं आहे.

नोएडाहून दिल्लीला जाणाऱ्या मार्गावरील बॅरिकेड्स रात्री उशिरा हटवण्यात आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. मात्र, चिल्ला सीमा बंद झाल्यामुळे वाहनचालकांना दिल्लीला जाण्यासाठी डीएनडी आणि कालिंदी कुंजमधून जावे लागले.