पाच चक्रीवादळे तयार होणे असामान्य ; महाचक्रीवादळांमुळे होतंय मोठं नुकसान

१९९० पासून दरवर्षी बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात (Bay of Bengal and Arabian Sea) साधारणपणे चार चक्रीवादळांची निर्मिती होते. असे हवामान खात्याचे महासंचालक मृत्यूंजय मोहापात्रा (Mrityunjaya Mohapatra) यांनी सांगितले आहे.

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षात बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात (Bay of Bengal and Arabian Sea) पाचपैकी चार चक्रीवादळे तीव्र आणि वरच्या श्रेणीतील होती. अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. अरबी समुद्रात मान्सूनपूर्व काळात आणि बंगालच्या उपसागरात (ऑक्टोबर-डिसेंबर) चक्रीवादळांची निर्मिती होणे सामान्य असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

१९९० पासून दरवर्षी बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात साधारणपणे चार चक्रीवादळांची निर्मिती होते. असे हवामान खात्याचे महासंचालक मृत्यूंजय मोहापात्रा (Mrityunjaya Mohapatra) यांनी सांगितले आहे.

त्यामुळे, पाच चक्रीवादळे तयार होणे असामान्य नाही. यंदा बंगालच्या उपसागरातील ‘अम्फान’ या महाचक्रीवादळानंतर पंधरा दिवसांतच अरबी समुद्रात निसर्ग चक्रीवादळ तयार झाले. गेल्या महिन्याभरात बंगालच्या उपसागरात आणखी दोन तर अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार झाले.

तीव्र चक्रीवादळांचा वेग ताशी १२० ते १६० कि.मी असतो. त्यामुळे वृक्ष उन्मळून पडतात. दळणवळण सेवा विस्कळित होते. कच्च्या घरांचेही नुकसान होते. सुमारे १६० ते २२० कि.मी. प्रतितास वेगाच्या अतितीव्र चक्रीवादळांमुळे या सर्वांबरोबरच घरांचे तसेच पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान होऊ शकते.