अयोध्येतील राम मंदिराचा पाया तयार, आता पाया भरण्याच्या कामात करण्यात आलेत 48 थर, वाचा ताज्या अपडेट

गाभाऱ्याच्या जागेवर १४ मीटर आणि अन्य जागांसाठी १२ मीटर मोठा पर्वत उभारला गेला. यातून एक थेंबही पाणी खाली जाणार नाही. हाच मंदिराचा मजबूत आधार आहे. मंदिराचा दुसरा टप्पा २ महिन्यांत पूर्ण केला जाईल. अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली आहे.

    अयोध्येतील भव्य राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. मंदिराचा पाया भरण्याचे काम पूर्ण झाले असून, पाया भरण्याच्या कामात, 48 थर केले गेले आहेत. आता मिर्झापूरचे रेडस्टोन बसवले जातील. मंदिर बांधणीचे काम चोवीस तास केले जात आहे. यासाठी 12-12 तासांच्या दोन शिफ्ट ठेवण्यात आल्या आहेत. जेणेकरून 2023 मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल. यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून मंदिराचे बांधकाम कार्य वेगाने सुरू आहे.

    ४०० बाय ३०० वर्ग फुटांवर तयार पायावर शिलांची भुकटी, बारीक शिलाखंड आणि सिमेंटच्या मिश्रणापासून तयार कृत्रिम पर्वतासाठी १८ महिने लागले. पुढील काही दिवसांत १.५ मीटर उंच काँक्रीटचा आणखी एक थर चढवला जाईल. त्यावर मिर्झापूरच्या गुलाबी दगडांपासून प्लिंथ केले जाईल.

    गाभाऱ्याच्या जागेवर १४ मीटर आणि अन्य जागांसाठी १२ मीटर मोठा पर्वत उभारला गेला. यातून एक थेंबही पाणी खाली जाणार नाही. हाच मंदिराचा मजबूत आधार आहे. मंदिराचा दुसरा टप्पा २ महिन्यांत पूर्ण केला जाईल. अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली आहे.

    मंदिराच्या बांधकामात जमिनीखाली 12 मीटर जाडीचा खडक तयार करण्यात आला आहे. या खडकाला तयार करण्यासाठी 6 महिने लागले. कास्टिंगवर आणखी दीड मीटर जाड खडक येईल, जो पहिल्यापेक्षा मजबूत असेल. तराफा नंतर, दगड बसविणे सुरू होईल आणि मंदिराचा चौरस तयार होईल. सुमारे 30 हजार दगड एकावर एक ठेवून प्लिंथला 16 फूट उंची दिली जाईल. वाटेत जाळी बसवण्यात आली आहे. मंदिराचे बांधकाम कसे चालले आहे हे त्या जाळीतून पूर्णपणे स्पष्ट आहे. दीड मीटरचा जाड खडक बनवला जाईल आणि त्यानंतर दगडाच्या सहाय्याने चौथऱ्याची उंची काढली जाईल. असं देखील चंपत राय यांनी सांगीतलं.