मुलगी समजून लग्न केले; अन मधुचंद्राच्या रात्री समोर आले अजब सत्य!

त्यांची पत्नी त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती. म्हणून जेव्हा ते आपल्या पत्नीची मेडिकल टेस्ट करण्यासाठी घेऊन गेले, तेव्हा ती एक...

    पटना. मधुचंद्राची रात्र एक मनमोहक गोङगुलाबी क्षण. लग्नाची वरात, वरातीचा अफलातुन ङान्स, नातेवाईकांचा तो जबरदस्त जल्लोष. हे सगळे लग्नाचे वातावरण असताना कानपूरमध्ये एक अजबगजब किस्सा समोर आला आहे. जो ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.

    ही घटना तेव्हा उघड झाली, जेव्हा एका व्यक्तीने आपल्या सासरच्या मंडळींवर आरोप लावला होता की त्यांनी एका ट्रान्सजेंङर सोबत आपले लग्न करून दिले आहे. त्या व्यक्तीने लग्नाच्या वेळी आपल्या सासरच्या मंडळींनी आपल्याला पूर्णपणे अंधारात ठेवल्याचा आरोप लावला आहे.

    या तक्रारीनुसार २८ एप्रिलला लग्न झालेल्या व्यक्तीला सत्य तेव्हा कळले, जेव्हा त्यांची सुहागरात्र होती. त्याचे झाले असे की, त्यांची पत्नी त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती. म्हणून जेव्हा ते आपल्या पत्नीची मेडिकल टेस्ट करण्यासाठी घेऊन गेले, तेव्हा ती एक ट्रान्सजेंङर आहे, हे त्यांना माहीत झाले.

    पोलीस अधिकारी कुंज बिहारी मिश्रा यांनी सांगितले की, “शास्त्री नगर येथील निवासी यांनी जिल्ह्याच्या पनकी क्षेत्रातील एका महिलेसोबत लग्न केले. लग्नानंतर जेव्हा सुहागरात्रीच्या वेळी ते आपल्या पत्नीसोबत संबंध ठेवण्यासाठी गेले असता तिने आपल्या तब्येतीची समस्या सांगितली. मात्र जसे दिवसांमागून दिवस जाऊ लागले, त्याप्रकारे त्यांना काहीतरी गडबड असण्याचा संशय आला.

    शेवटी ते आपल्या पत्नीला घेऊन चेकअपसाठी गेले, जिथे त्यांना समजले की, ती एक ‘ट्रान्सजेंङर आहे. या घटनेनंतर सासरच्या आठ लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आणि त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात आली.