सुरतमध्ये कोरोनाचा कहर ; स्मशानात मृतदेहांचा खच ; सततच्या दहनाने विद्युतदाहिन्यांची धुरांडी वितळली

सध्याच्या घडीला स्मशानभूमीत दिवसाला ८० मृतदेह येत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीतील सर्व विद्युतदाहिन्या धगधगत्या राहत आहेत. आम्ही थोडाथोडावेळाने प्रत्येक विद्युतदाहिनीचा वापर करत असलो तरी मृतदेहांची संख्याच इतकी जास्त आहे की, या विद्युतदाहिन्या सतत सुरु आहेत. त्यामुळेच या विद्युतदाहिन्यांच्या चिमण्या उष्णतेने वितळल्याची माहिती रामनाथ गेल्हा स्मशानभूमीतील अधिकाऱ्याने दिली.

    सुरत: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात आरोग्य व्यवस्था कोलमडली आहेत. त्यातच कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत असून येथील प्रसिद्ध व्यापार केंद्र असलेल्या सुरतमध्ये कोरोनाने कहर केला आहे याठिकाणी रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढला आहे. मृतांच्या वाढत्या संख्येमुळे स्मशानभूमींमध्ये २४ तास अंत्यसंस्कार सुरु आहेत. यामुळे स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर इतका ताण आला आहे की, चितांच्या उष्णतेमुळे विद्युतदाहिन्यांची धुरांडीही वितळली आहेत.

    मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वेटिंगमध्ये

    गेल्या आठ-दहा दिवसांपासून स्मशाभूमींमध्ये अहारोत्र मृतदेह जळत आहेत. अश्विनीकुमार आणि रामनाथ घेला या दोन स्मशानभूमींमध्ये मृतदेहांचा ओघ जास्त आहे. जवळपास १६ विद्युतदाहिन्यांमध्ये दररोज १०० हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याची माहिती येथील प्रशासनाने दिली.
    स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्या अविरत काम करत असल्याने त्यांच्यात बिघाड व्हायला सुरुवात झाली आहे. यापूर्वी दिवसाला आमच्या स्मशानभूमीत २० मृतदेह येत असत. यापैकी काही मृतदेहांना लाकडांवर अग्नी दिला जात असे. तर उर्वरित मृतदेहांचा दाहसंस्कार विद्युतदाहिनीमध्ये होत असे.

    मात्र, सध्याच्या घडीला स्मशानभूमीत दिवसाला ८० मृतदेह येत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीतील सर्व विद्युतदाहिन्या धगधगत्या राहत आहेत. आम्ही थोडाथोडावेळाने प्रत्येक विद्युतदाहिनीचा वापर करत असलो तरी मृतदेहांची संख्याच इतकी जास्त आहे की, या विद्युतदाहिन्या सतत सुरु आहेत. त्यामुळेच या विद्युतदाहिन्यांच्या चिमण्या उष्णतेने वितळल्याची माहिती रामनाथ गेल्हा स्मशानभूमीतील अधिकाऱ्याने दिली.