देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक मृत्यूची नोंद, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ

देशात गेल्या २४ तासांत आत्तापर्यंतच्या सर्वाधिक कोरोना मृतांची नोंद झाली आहे. तसेच भारतात आत्तापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.आज देशात ३ लाख ६० हजार ९६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोना मृतांचा आकडा ३२९३ वर पोहचला आहे.

    देशात कोरोनास्थिती दिवसागणिक गंभीर बनत असून रुग्णसंख्या नवनवे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. यात मंगळवारी देशातील रुग्णसंख्येत काही अंशी घट झाली होती, मात्र आज रुग्णसंख्येची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.

    देशात गेल्या २४ तासांत आत्तापर्यंतच्या सर्वाधिक कोरोना मृतांची नोंद झाली आहे. तसेच भारतात आत्तापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.आज देशात ३ लाख ६० हजार ९६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोना मृतांचा आकडा ३२९३ वर पोहचला आहे.

    देशात कोरोनाचा कहर कायम असून आज कोरोनामुळे मृत पावणाऱ्या रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. यात २ लाख ६१ हजार १६२ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा संख्येत थोडी वाढ झाली आहे. याबाबतची आकडेवारी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.