देशात गेल्या २४ तासांत कोरोना रूग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ६ लाख ३९ हजार ९२९ इतके पॉझिटिव्ह रूग्ण सक्रीय आहेत. तसेच १५ लाख ८३ हजार ४९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर काहींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु कोरोना रूग्णांच्या मृत्यूची संख्या पाहता ४५ हजार २५७ इतकी झाली आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होतोना दिसत आहे. कोरोनाचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल ५३ हजार ६०१ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २२ लाख ६८ हजार ६७६ वर पोहचली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ६ लाख ३९ हजार ९२९ इतके पॉझिटिव्ह रूग्ण सक्रीय आहेत. तसेच १५ लाख ८३ हजार ४९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर काहींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु कोरोना रूग्णांच्या मृत्यूची संख्या पाहता ४५ हजार २५७ इतकी झाली आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

देशात सक्रीय रुग्णांचे प्रमाण २८.२१ टक्के इतके आहे. तर मृत्यूचे प्रमाण १.९९ टक्के आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात सुद्धा कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या संख्येने होत आहे. राज्यात आतापर्यंत ३ लाख ५८ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या १ लाख ४७ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.