corona

देशात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची नवीन प्रकरणे आढळण्याचा आकडा हा ६० ते ६५ हजारांवर होता. परंतु प्रथमच एकाच दिवश ६२ हजाराहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर ७४.३० टक्के आहे.

भारतात कोरोना संसर्गाची लागण वेगाने होत आहे. देशात काही दिवसांपासून दररोज सुमारे ६० ते ६५ हजार प्रकरणे नोंदविली जात आहेत. कोरोनाव्हायरसवर मात करण्यासाठी जगभरात लस शोधण्यात येत आहेत. परंतु आतापर्यंत केवळ लस तयार केल्याचा दावा फक्त रशियाने केला आहे. भारतात तीन कंपन्या लस तयार करण्यात गुंतल्या आहेत. आज पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाने सांगितले की एका दिवसात कोरोनावर मात केल्याच्या नोंदी तपासल्या गेल्या आहेत.

मंत्रालयाने म्हटले आहे की भारतात दररोज तपासणीत वाढ केली जात आहे. गेल्या २४ तासांत आतापर्यंत ९,१८,४७० चाचण्या घेण्यात आल्या आहेत. अँटीजन चाचणीचा वेगही सतत वाढविला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्याच्या काळाविषयी बोलताना,दिवसाला चाचण्यांची संख्या २३६६८ वर पोहोचली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की हा विषाणू रोखण्यासाठी आणि त्याचे परिणाम कमी करण्यासाठी शक्य तितक्या चाचणी घेणे सर्वात महत्वाचे आहे. मंत्रालयाच्या वतीने म्हटले आहे की आतापर्यंत भारतात २१ लाख लोक बरे झाले आहेत.

देशात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची नवीन प्रकरणे आढळण्याचा आकडा हा ६० ते ६५ हजारांवर होता. परंतु प्रथमच एकाच दिवश ६२ हजाराहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर ७४.३० टक्के आहे. 

मागील २४ तासात देशात ६८हजार ८९८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९८३ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने २९ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर ५४,८४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.