बापरे ! वकिलाने फी म्हणून घेतले २१७ कोटी रोख ; आयकर विभागाची ३८ ठिकाणी छापेमारी

चंदीगड : मोठमोठ्या सेलिब्रेटींसाठी किंवा देशातील बड्या व्यक्तींसाठी काम करणारे वकील त्यांच्या शुल्काच्या रूपात तगडी रक्कम घेतात. पण एखाद्या वकिलाने त्याच्या फीसाठी २१७ कोटी रोख घेतल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? चंदीगडमध्ये अशी घटना समोर आली आहे. याठिकाणी एका वकिलाने त्याच्या क्लायंट्सकडून जवळपास २१७ कोटी रुपये रोख घेतल्याचे समोर आले आहे. आयकर विभागाने या चंदीगडमधील एका प्रसिद्ध वकिलावर कर चुकवल्याच्या आरोपावरून छापा टाकला आहे.

साडे पाच कोटी रोख जप्त
कर चुकवल्याप्रकरणी या वकिलावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. वकिलाने ग्राहकाकडून तब्बल २१७ कोटी रुपये रोख स्वीकारल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हरयाणा आणि दिल्लीमधील ३८ ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी साडे पाच कोटींची रोख रक्कम जप्त केली. वकिलाची ओळख मात्र उघड करण्यात आलेली नाही.

१० लॉकर्सही घेतले ताब्यात
वकिलाचे १० बँक लॉकर्स जप्त करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने दिली आहे. वाद मिटविण्यासाठी वकील आपल्या ग्राहकांकडून भरीव रक्कम रोख स्वरूपात घेत असल्याचा संशय होता. गेल्या अनेक वर्षांपासून केलेली गुंतवणूक आणि बेहिशोबी रकमेची कागदपत्रे तपासादरम्यान सापडली आहेत, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

दाखविली फक्त २१ कोटी रक्कम
वकिलाने एका ग्राहकाकडून ११७ कोटी रुपये रोख रक्कम घेतली होती, पण रेकॉर्डवर फक्त चेकच्या माध्यमातून मिळालेली २१ कोटी दाखवली, असा आरोप केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने केला आहे तर दुसऱ्या एका प्रकरणात त्याने एका कंपनीकडून १०० कोटी रुपये घेतले होते असा दावा आहे. हा सर्व पैसा वकील निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता विकत घेण्यासाठी वापरत होता. याशिवाय शाळांच्या ट्रस्टमध्येही वापरत होता. पुरावे हाती आलेत त्यानुसार, महागड्या परिसरात त्याने गेल्या दोन वर्षात जवळपास १०० कोटींहून अधिक पैसे संपत्ती विकत घेण्यासाठी खर्च केलेत, असे सांगण्यात आले आहे. याशिवाय वकील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रोख रक्कम देत शाळा आणि संपत्ती विकत घेतल्या. यांची किंमत १०० कोटींहून अधिक आहे अशी माहिती दिली आहे. वकिलाने हवाला फंडमधूनही काही पैसे मिळवले आहेत.