OMG! त्याने केला बलात्काराचा प्रयत्न पण महिलेने घडवली अद्दल अन् मुळापासूनच कापले त्याचे लिंग

आरोपीने जेव्हा महिलेला सोडले नाही त्यावेळी तिने खाटेवर ठेवलेल्या धारदार शस्त्राने रमेशचे गुप्तांग कापले अशी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर महिला स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाली आणि तिने घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली.

    सीधी : मध्यप्रदेश (Madhya Pradesh) च्या सीधी जिल्ह्यातील उमरीहा गावात एका महिलेने आपल्या घरात घुसलेल्या एका व्यक्तीचे लिंग मुळासकट कापून टाकले. पीडित व्यक्तीने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर जबरदस्ती बलात्कार (Rape) करण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी (Police) याबाबतची माहिती दिली. सीधी जिल्ह्यातील खड्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी उपनिरीक्षक धर्मेंद्र सिंह राजपूत यांनी शनिवारी महिलेच्या तक्रारीवरून सांगितले की, गुरुवारी रात्री११ वाजता रमेश साकेत (४५) महिलेच्या घरात जबदस्तीने घुसला आणि महिलेवर जबदस्ती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

    जेव्हा महिलेने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. आरोपीने जेव्हा महिलेला सोडले नाही त्यावेळी तिने खाटेवर ठेवलेल्या धारदार शस्त्राने रमेशचे गुप्तांग कापले अशी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर महिला स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाली आणि तिने घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली. सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि आरोपीला उपचारांसाठी सेमरिया रुग्णालयात दाखल केले.

    येथून त्याला जिल्हा रुग्णालय आणि त्यानंतर रीवा येथील संजय गांधी मेडिकल कॉलेज येथे पाठविण्यात आले. आरोपी विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून महिलेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपार करत असल्याची माहिती राजपूत यांनी दिली.