संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून सुरू होणार

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनातून प्रश्नोत्तरांचा तास वगळण्यात आला आहे. तसेच प्रायव्हेट मेंबर बिलसाठी कोणताही विशेष दिवस ठेवण्यात आलेला नाही.

कोरोनाच्या संकटाच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला १४ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्या परवानगीने लोकसभा सचिवालयाने त्यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. तसेच हे अधिवेशन १ ऑक्टोंबरपर्यंत चालणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनातून प्रश्नोत्तरांचा तास वगळण्यात आला आहे. तसेच प्रायव्हेट मेंबर बिलसाठी कोणताही विशेष दिवस ठेवण्यात आलेला नाही.

१४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. राज्यसभेची बैठकही त्याच दिवशी बोलवली जाणार आहे. परंतु अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी आता खासदारांनाही कोरोनाची चाचणी करावी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, उच्च सभागृहाच्या सत्रादरम्यान सदस्य दोन्ही चेंबर आणि गॅलरीमध्ये बसतील. भारतीय संसदीय इतिहासात सन १९५२ नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येत आहे.