om birla

संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session Of Parliament) घेण्याची शिफारस केली होती. या अधिवेशनात सरकार अनेक बिलं सादर करु शकते.

    संसदेचे पावसाळी अधिवेशन(Monsoon Session Of Parliament) १९ जुलैपासून सुरू होणार आहे. १३ ऑगस्टपर्यंत  हे अधिवेशन सुरु राहणार आहे. पावसाळी अधिवेशनात एकूण १९ दिवस कामकाज चालणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला(Loksabha Speaker Om Birla) यांनी दिली आहे.तसेच सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज चालेल, असेही ते म्हणाले.

    संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. या अधिवेशनात सरकार अनेक बिलं सादर करु शकते. कोरोना संकट आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करण्याची शक्यता आहे.

    अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व नियमांचे पालन केले जाईल, अशी माहितीही  देण्यात आली आहे. संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी कोरोना लसीचा किमान एक डोस घेतला असेल, हे तपासले जाईल.