प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत बँकेतील खात्यांची संख्या ४० कोटींच्या वर

  • या योजनेचा लाभ ४० कोटी लोकांना झाला आहे. या योजनेची सुरूवात सहा वर्षापहिले म्हणजेच २८ ऑगस्ट २०१४ साली झाली होती. परंतु आतापर्यंत ४० कोटींच्या वर लोकांनी जन धन खाते उघडले असून या खात्यांमध्ये १.३० पेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे.

प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत ४० कोटींपेक्षा जास्त बँकेत खाते उघडले आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ ४० कोटी लोकांना झाला आहे. या योजनेची सुरूवात सहा वर्षापहिले म्हणजेच २८ ऑगस्ट २०१४ साली झाली होती. परंतु आतापर्यंत ४० कोटींच्या वर जनधन खाते उघडले असून या खात्यांमध्ये १.३० पेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे.

अर्थमंत्र्यालयांनी केलेल्या एका ट्विट मध्ये सांगतिलं आहे की, जनधन योजनेअंतर्गत एकूण ४० कोटीपेक्षा जास्त  बँकेत खाते उघडले असून या योजनेसोबतच रूपये कार्ड आणि खातेधारकांना ओवरड्राफ्टची सुविधा देण्यात येत आहे. या खात्यामध्ये पैसे ठेवण्याची आवश्यकता नाही. परंतु ओवरड्राफ्टची सुविधा वाढवली असून ती १० हजार रूपये इतकी झाली आहे.

तसेच कोरोना विषाणूचा कहर संपूर्ण देशात वाढत आहे. त्यामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत कोविड-१९ च्या रूग्णांना आणि गरीबांना मदत म्हणून १५०० रूपये खात्यात जमा करण्यात आले आहेत.