The number of Black Fungus patients in the country is as high as 11 thousand 717 nrms | देशात Black Fungus चे थैमान, तब्बल ११ हजार ७१७ इतक्या रूग्णांची नोंद ; प्रशासनाच्या चिंतेत भर | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
देश
Published: May 27, 2021 07:00 AM

Black Fungusदेशात Black Fungus चे थैमान, तब्बल ११ हजार ७१७ इतक्या रूग्णांची नोंद ; प्रशासनाच्या चिंतेत भर

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
देशात Black Fungus चे थैमान, तब्बल ११ हजार ७१७ इतक्या रूग्णांची नोंद ; प्रशासनाच्या चिंतेत भर

हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात 25 मे 2021 रोजी रात्री 9.30 वाजेपर्यंतची आकेडवारी देण्यात आली आहे.

  नवी दिल्ली :  देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत. काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे.

  हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात 25 मे 2021 रोजी रात्री 9.30 वाजेपर्यंतची आकेडवारी देण्यात आली आहे.

  देशामध्ये आतापर्यंत एकूण 11 हजार 717 जणांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे गुजरात आणि महाराष्ट्रामधील असल्याचं दिसून आलं आहे. ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गुजरातमध्ये 2859, महाराष्ट्रात 2770, आंध्र प्रदेशमध्ये 768, मध्य प्रदेश 752, तेलंगणा 744, उत्तर प्रदेश 701 आणि राजस्थानमध्ये 492 ब्लॅक फंगसच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  २५ शुक्रवार
  शुक्रवार, जून २५, २०२१

  भारतीय अधिकाऱ्यांनी तालिबान्यांशी केलेली चर्चा फलदायी ठरेल, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.