देशात जवळपास ४२ दिवसांनंतर कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या खाली! तर कोरोना मृतांची संख्या तीन लाखांपार

सोमवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात ३ लाख ०२ हजार ५४४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून एकूण बरे झालेल्यांची संख्या २ कोटी ३७ लाख २८ हजार ११ झाली आहे. एकूण रुग्णांची संख्या आता २ कोटी ६७ लाख ५२ हजार ४४७ झाली आहे. त्यापैकी २७ लाख २० हजार ७१६ जण उपचाराधीन आहेत.

    नवी दिल्ली : देशासाठी दिलासादायक बातमी असून गेल्या ४२ दिवसांत पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या खाली आली आहे. यामुळे कोरोना संक्रमणाची दुसरी लाट ओसरताना दिसतेय. गेल्या २४ तासांत देशात दोन लाखांपेक्षाही कमी करोनाबाधित आढळले आहेत. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात सोमवारी (२४ मे २०२१) १ लाख ९६ हजार ४२७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ६९ लाख ४८ हजार ८७४ वर पोहचलीय. देशात सध्या २५ लाख ८६ हजार ७८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापूर्वी १४ एप्रिल रोजी कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांहून कमी होती.

    भारतात कोरोना बळींची संख्या सोमवारी तीन लाखांचा टप्पा ओलांडून गेली असून २४ तासात ४४५४ बळी गेले आहेत. त्यामुळे अमेरिका व ब्राझीलनंतर तीन लाखांपेक्षा अधिक बळी जाणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे.

    सोमवारी २ लाख २२ हजार ३१५ नवे रुग्ण सापडले असून १५ एप्रिलपासून ही नीचांकी संख्या आहे. तमिळनाडूत ३५४८३ रुग्ण सापडले असून महाराष्ट्रात २६६७२ रुग्ण सापडले आहेत तर कर्नाटकात ही संख्या २५९७९ आहे. राजस्थान, दिल्ली, हरयाणा या सरकारांनी रविवारी टाळेबंदीत वाढ केली असून राजस्थानात ८ जून पर्यंत टाळेबंदी राहणार आहे. दिल्ली व हरयाणात ३१ मे पर्यंत टाळेबंदी राहणार आहे. उत्तराखंड सरकारने टाळेबंदी १ जून पर्यंत वाढवली असून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ८ ते ११ सुरू राहणार आहेत.

    सोमवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात ३ लाख ०२ हजार ५४४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून एकूण बरे झालेल्यांची संख्या २ कोटी ३७ लाख २८ हजार ११ झाली आहे. एकूण रुग्णांची संख्या आता २ कोटी ६७ लाख ५२ हजार ४४७ झाली आहे. त्यापैकी २७ लाख २० हजार ७१६ जण उपचाराधीन आहेत. एकूण मृतांची संख्या ३ लाख ३७ हजार २०० झाली आहे. एकूण १९ कोटी ६० लाख ७१ हजार ९६२ जणांचे लसीकरण झाले आहे.रुग्णांची संख्या १९ डिसेंबरला १ कोटीवर होती. ४ मे रोजी ती २ कोटीहून अधिक झाली आहे.