कोरोना बाधितांची संख्या पुन्हा दोन लाखांच्या वर; मृत्यूच्या प्रमाण वाढ तर बरं होणाऱ्यांच्या संख्येत घट

सोमवारी जवळजवळ ४० दिवसांनंतर दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या दोन लाखांच्या खाली आल्यानंतर मंगळवारी या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे २ लाख ८ हजार ९२१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २ लाख ९५ हजार ९५५ करोना रुग्ण मंगळवारी कोरोनामधून बरे झाले आहेत

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात मोठ्या प्रमाणावर थैमान घातले होते. या काळात दररोज साडेचार लाखांच्या आसपास रुग्ण आढळत होते.मात्र मागील काही दिवसांत रुग्ण संख्येत मोठी घट झाली आहे. महिन्याभरात ही संख्या दोन लाखांच्या खाली आली आहे. गेल्या २४ तासांत एक लाख ९६ हजार ४२७ नवीन कोरोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही २६ लाखांच्या खाली आहे. देशातील मृतांची दररोजची सरासरी देखील खाली येताना दिसत असून, एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे तीन हजार ५११ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे सोमवारी मृत पावलेल्या रुग्णांच्या प्रमाणात ही आकडेवारी कमी झाली आहे.

     

    सोमवारी जवळजवळ ४० दिवसांनंतर दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या दोन लाखांच्या खाली आल्यानंतर मंगळवारी या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे २ लाख ८ हजार ९२१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २ लाख ९५ हजार ९५५ करोना रुग्ण मंगळवारी कोरोनामधून बरे झाले आहेत. सध्या उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या २५ लाखांच्याही खाली आली आहे. मात्र त्याच वेळेस कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण पुन्हा वाढल्याचं दिसून आलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे ४ हजार १५७ जणांचा मृत्यू झालाय. आरोग्यमंत्रालयाने बुधवारी यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे.

    आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात मागील २४ तासांत २ लाख ८ हजार ९२१ नवीन कोरोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २ लाख ९५ हजार ९५५ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर घालणाऱ्या मृतांच्या संख्येमध्ये कालच्या तुलनेत वाढ झालीय. गेल्या २४ तासांत देशात ४ हजार १५७ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या ३ लाख ११ हजार ३८८ वर पोहोचली आहे.