corona virus

देशातील कोरोना बाधितांची संख्या ५७ लाख ३२ हजार ५१९ इतकी झाली असून, २४ तासांत १ हजार १२९ जण मृत्युमुखी पडल्यामुळे मृतांची एकूण संख्या ९१ हजार १४९ झाली आहे. देशात ९ लाख ६६ हजार ३८२ जणांवर उपचार सुरु (active cases) आहेत.

देशात कोरोना विषाणूचा (Corona Virus) आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या काही आठवड्यापासून अचानक झालेल्या रुग्णवाढीने देशातील एकूण रुग्णांची संख्याही प्रचंड वाढली असून, ५७ लाखांच्या पुढे गेली (Crosses 57-lakh) आहे. गेल्या २४ तासात देशात ८६ हजार ५०८ नवे रूग्ण आढळले आहेत. तर १ हजार १२९ जणांचा संसर्ग होऊन मृत्यू (86,508 new cases & 1,129 deaths in last 24 hours) झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare ) दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना बाधितांची संख्या ५७ लाख ३२ हजार ५१९ इतकी झाली असून, २४ तासांत १ हजार १२९ जण मृत्युमुखी पडल्यामुळे मृतांची एकूण संख्या ९१ हजार १४९ झाली आहे. देशात ९ लाख ६६ हजार ३८२ जणांवर उपचार सुरु (active cases) आहेत. तर कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या ४६ लाख ७४ हजार ९८८ इतकी झाली आहे.

दरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत ६ कोटी ७४ लाख ३६ हजार ३१ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनामुळे मृत्यूंचा दर १.५९ टक्क्य़ांपर्यंत कमी झाला आहे.