देशात कोरोनाचा धुमाकूळ, कोरोनाबाधितांचा आकडा १९ लाख ६४ हजारांच्या पार

  • देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १९ लाख ६४ हजार ५३७ इतका झाला आहे. तर ५ लाख ९५ हजार ५०१ कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच १३ लाख २८ हजार ३३७ रुगणांनी कोरोनावर मात केल्याने घरी सोडण्यात आले आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. बरे होण्याचे प्रमाण आता ६३ टक्क्यांच्या वरती गेले आहे.

नवी दिल्ली – देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदविस वाढतच आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारीत वाढ होत आहे. तसेच कोरोना बाधितांचा रोजची नोंद होण्याचा आकडा ५० हजारांच्या घरात पोहचला आहे. यामुळे देशातील रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत पुन्हा ५६ हजार २८२ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा १९ लाखांच्यावर गेला आहे. २४ तासात कोरोनामुळे ९०४ कोरोना रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे. 

देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १९ लाख ६४ हजार ५३७ इतका झाला आहे. तर ५ लाख ९५ हजार ५०१ कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच १३ लाख २८ हजार ३३७ रुगणांनी कोरोनावर मात केल्याने घरी सोडण्यात आले आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. बरे होण्याचे प्रमाण आता ६३ टक्क्यांच्या वरती गेले आहे.