देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ४३ लाखांचा टप्पा

देशातील कोरोनाबाधितांची (Corona Patients) एकूण संख्या ४३ लाख ७० हजार १२९ वर पोहचली आहे. गेल्या २४ तासांत देशभरातील ४३ लाख ७० हजार १२९ कोरोनाबाधितांमध्ये ८ लाख ९७ हजार ३९४ रुग्ण (Active Cases) उपचार घेत आहेत.

संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा (Corona virus)  कहर सुरूच आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल ८९ हजार ७०६ नवे ( New Cases )कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून १ हजार ११५ रुग्णांचा मृत्यू (Deaths) झाला आहे. मात्र, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४३ लाखांच्या (Crosses 43 lakh mark ) वर गेली आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४३ लाख ७० हजार १२९ वर पोहचली आहे. गेल्या २४ तासांत देशभरातील ४३ लाख ७० हजार १२९ कोरोनाबाधितांमध्ये ८ लाख ९७ हजार ३९४ रुग्ण (Active Cases) उपचार घेत आहेत. तर ३३ लाख ९८ हजार ८४५ जणांना कोरोनावर मात केली आहे. त्याचसोबतच आतापर्यंत मृत्यू झालेले ७३ हजार ८९० जणांच्या संख्येचा समावेश आहे.

दरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात ८ सप्टेंबरपर्यंत ५,१८,०४,६७७ नमूने तपासण्यात आले आहेत. यातील ११ लाख ५४ हजार ५४९ नमून्यांची काल तपासणी झाली आहे.