देशात कोरोनाबाधितांचा आकडा ३७ लाखांच्या पार

देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३७ लाख ६९ हजार ५२४ इतकी झाली आहे. तर ८ लाख १ हजार २८२ जणांवर रुग्णालयात उपचार (active cases) सुरू आहेत. २९ लाख १ हजार ९०९ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशात आतापर्यंत ६६ हजार ३३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

संपूर्ण देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत (corona virus) वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ७८ हजारहून अधिक जणांना कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आले आहे. देशात गेल्या २४ तासांत ७८ हजार ३५७ नवे कोरोनाबाधित रुग्ण ( new positive cases) आढळले असून, कोरोनामुळे १ हजार ४५ जणांचा मृत्यू (deaths ) झाला आहे. मागील काही दिवसांपासून देशात करोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाल्याची स्थिती आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, नव्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३७ लाख ६९ हजार ५२४ इतकी झाली आहे. तर ८ लाख १ हजार २८२ जणांवर रुग्णालयात उपचार (active cases) सुरू आहेत. २९ लाख १ हजार ९०९ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशात आतापर्यंत ६६ हजार ३३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, काल मंगळवारी कोरोना रूग्णांच्या संख्येत थोडीशी घट झालेली पाहायला मिळत होती. परंतु आज देशातील कोरोना रूग्णांचा आकडा ७८ हजारांच्या वर गेला असून पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे.