corona

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात ८ लाख ३१ हजार १२४ अॅक्टिव्ह केसेस (active cases) असून ३० लाख ३७ हजार १५२ रूग्ण कोरोनामुक्त (cured) झाले आहेत. देशात आतापर्यंत ६८ हजार ४७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात दिवसभरात ८३,८८३ तर राज्यात १८,१०५ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

देशात कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली असून ३९ लाखांचा (crosses 39-lakh ) टप्पा पार झाला आहे. गेल्या २४ तासांत देशात ८३ हजार ३४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण (new cases) आढळले आहेत. तर १०९६ रुग्णांच्या मृत्यूची (deaths ) नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण रुग्णसंख्या ३९ लाख ३६ हजार ७४८ इतकी झाली आहे. कोरोनाच्या रुग्णवाढीने राज्यासह देशात गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात ८ लाख ३१ हजार १२४ अॅक्टिव्ह केसेस (active cases) असून ३० लाख ३७ हजार १५२ रूग्ण कोरोनामुक्त (cured) झाले आहेत. देशात आतापर्यंत ६८ हजार ४७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात दिवसभरात ८३,८८३ तर राज्यात १८,१०५ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

राज्यात रुग्णवाढीबरोबरच मृतांची संख्याही वाढत आहे. नागपूर आणि पुणे या दोन शहरांमध्ये रुग्णसंख्येचा आलेख वाढत चालला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८ लाख ४३ हजार झाली असून, २५,५८६ जणांचा मृत्यू झाला आहे.