Corona

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ६१ लाख ४५ हजार ५७६ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात सध्याच्या घडीला ९ लाख ४७ हजार ५७६ रुग्णांवर उपचार सुरू (active cases)  आहेत. तर आतापर्यंत ५१ लाख १ हजार ३९८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु देशातील ९६ हजार ३१८ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाबाधितांच्या (corona virus) संख्येत दिवसागणिक वाढ होतोना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासात ७० हजार ५८९ नव्या रुग्णांची नोंद (new cases) करण्यात आली आहे. तर देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने ६१ लाखांचा (crosses 61-lakh ) टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासात ७७६ रुग्णांचा मृत्यू (deaths ) झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ६१ लाख ४५ हजार ५७६ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात सध्याच्या घडीला ९ लाख ४७ हजार ५७६ रुग्णांवर उपचार सुरू (active cases)  आहेत. तर आतापर्यंत ५१ लाख १ हजार ३९८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु देशातील ९६ हजार ३१८ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 

राज्यात सोमवारी १९ हजार ९३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, ११ हजार ९२१ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ७७.७१ टक्क्यांवर पोहचला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या संख्या जास्त आहेत.