पडद्यावरचा चिट्टी रोबोट आता वास्तवात अवतरणार, आयआयटी कानपूरच्या तज्ञांचे काम सुरू

सध्या मशीन लर्निंग आणि आर्टिफिशिल इंटेलिजन्स आणि प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून रोबोटला संचालित केले जाते. रोबोटला सूचना देऊन काम करून घेतले जाते. मात्र यापुढे त्याच्यामध्ये माणसांसारखा विचार करण्याची तसेच भावना व्यक्त करणारी गुणवत्ता जोडली जाणार आहे

जपानमध्ये (Japan) माणसांसारखा विचार करणारा आणि भावभावना असलेला असा रोबोट (Robot) याआधी तयार झालाय. लवकरच भारतातही असा रोबोट अवतरणार आहे. आयआयटी कानपूरचे (IIT Kanpur starting work ) तज्ञ त्यावर काम करत आहे.

सध्या मशीन लर्निंग आणि आर्टिफिशिल इंटेलिजन्स आणि प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून रोबोटला संचालित केले जाते. रोबोटला सूचना देऊन काम करून घेतले जाते. मात्र यापुढे त्याच्यामध्ये माणसांसारखा विचार करण्याची तसेच भावना व्यक्त करणारी गुणवत्ता जोडली जाणार आहे. त्याची सुरुवात लहान मुलांच्या भावनांपासून करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालयाच्या मुलांना रोबोटच्या सहवासात ठेवण्यात येत आहे.

मुलांमध्ये होऊ शकतात बदल

मुलांना राग कधी येतो, मुले आनंदी कधी होतात, त्यांना कसली भीती वाटते, आईबाबा, ताईदादा यांच्यासोबत मुलांचे नातं कसं असतं? हे सगळं सध्या रोबोट जाणून घेत आहे. प्रोग्रॅमिंग करून हे सगळं रोबोटमध्ये फिडिंग केल्यावर तो आपली प्रतिक्रिया देईल. म्हणजे मुले रडायला लागली किंवा घाबरली तर रोबोट त्यांना समजावेल. रोबोटकडे आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या जोरावर निर्णय घेण्याची क्षमता असेल. तो ओरडू शकतो, धोक्याचा इशारा देऊ शकतो.