तो फेसबुक लाईव्ह मध्ये देत होता सापांपासून बचावाच्या टिप्स, तेव्हाच घडलं असं की, त्याचाच झाला मृत्यू

मग अचानक तोच कोबरा मागे वळला आणि त्याला चावला आणि थोड्या वेळाने त्याचाच मृत्यू झाला. मीडिया रिपोर्टनुसार मनीष असे या मुलाचे नाव आहे. १९ वर्षीय मनीषने आतापर्यंत २०० साप पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडले आहे. त्यामुळे मंगळवारी मनीषला कोब्रा साप पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी बोलावले होते.

    राजस्थान: साप (Snake) पाहिल्यानंतर प्रत्येकाची भांबेरी उडते. साप पाहिल्यानंतर लोक त्याच्यापासून दूर पळून जातात. सापांशी संबंधित अनेक व्हिडिओ आणि चित्रे सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. त्याचप्रमाणे राजस्थानमधून (Rajasthan) या दिवसात अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एक सर्प तज्ज्ञ हातात कोब्रा साप धरून लोकांना साप पकडून त्यापासून संरक्षण कसे करायचे आणि आजूबाजूला उभे असलेले प्रत्येकजण त्याचे ऐकत होते.

    मग अचानक तोच कोबरा मागे वळला आणि त्याला चावला आणि थोड्या वेळाने त्याचाच मृत्यू झाला. मीडिया रिपोर्टनुसार मनीष असे या मुलाचे नाव आहे. १९ वर्षीय मनीषने आतापर्यंत २०० साप पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडले आहे. त्यामुळे मंगळवारी मनीषला कोब्रा साप पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी बोलावले होते.

    जेव्हा त्याने साप पकडला आणि लोकांना सांगत होता आणि लोकं व्हिडिओ बनवत होते. त्यापैकी एक फेसबुक लाईव्हही करत होता. पण तेव्हाच सापाने मनीषला चावा घेतला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.