रेल्वे ही एक सरकारी मालमत्ता आहे आणि ती सरकारी राहील ; रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचं स्पष्टीकरण

खासगी आणि सरकारी दोन्हीही क्षेत्रे अर्थचक्र पुढे नेण्यासाठी मदतच करतात, असा दावा करत विरोधकांचे आरोप त्यांनी फेटाळून लावले. रेल्वे स्थानकात वेटिंग रूम, एस्केलेटर आणि अशा अनेक सुविधांची गरज आहे. जवळपास ५० रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे.

    केंद्र सरकारवर रेल्वेचे खासगीकरण केल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे.रेल्वे ही एक सरकारी मालमत्ता आहे आणि ती सरकारी राहील, परंतु यात जर खासगी गुंतवणूक होत असेल तर त्यात कोणालाही अडचण होऊ नये. असं पियुष गोयल म्हणाले आहेत.

    खासगी आणि सरकारी दोन्हीही क्षेत्रे अर्थचक्र पुढे नेण्यासाठी मदतच करतात, असा दावा करत विरोधकांचे आरोप त्यांनी फेटाळून लावले. रेल्वे स्थानकात वेटिंग रूम, एस्केलेटर आणि अशा अनेक सुविधांची गरज आहे. जवळपास ५० रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. नवीन ४४ ‘वंदे भारत’ ट्रेन चालविण्यात येणार असून याची ऑर्डरही देण्यात आली आहे. लवकरच मार्ग निश्चित करून ट्रेन सुरू केल्या जातील, असे गोयल म्हणाले.