अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी शक्तिकांत दास यांचा मोठा निर्णय
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी शक्तिकांत दास यांचा मोठा निर्णय

रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळानं एक इनोव्हेशन हब उभारण्यावर चर्चा केली. तसेच बोर्डाने गेल्या वर्षभरातील बँकेच्या विविध कामकाजावर चर्चा केली. तसेच २०१९-२०च्या अकाउंट्सला मंजूरी दिली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारला आर्थिक वर्ष २०१९-२० साठी ५७ हजार १२८ कोटी रूपये सरप्लस देण्याच्या प्रस्तावाचा समावेश होता.

रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाकडून केंद्र सरकारला आर्थिक वर्ष २०१९-२० साठी ५७ हजार १२८कोटी रूपयांचा सरप्लस देण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ही माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळानं एक इनोव्हेशन हब उभारण्यावर चर्चा केली. तसेच बोर्डाने गेल्या वर्षभरातील बँकेच्या विविध कामकाजावर चर्चा केली. तसेच २०१९-२०च्या अकाउंट्सला मंजूरी दिली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारला आर्थिक वर्ष २०१९-२० साठी ५७ हजार १२८ कोटी रूपये सरप्लस देण्याच्या प्रस्तावाचा समावेश होता. 

 कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, सध्याची आर्थिक परिस्थिती आणि देशांतर्गत आव्हाने यातून बाहेर पडण्यासाठी ही रक्कम दिली जात आहे. रिझर्व्ह बँकेला आपल्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा आयकर द्यावा लागत नाही. त्यामुळे आपल्या गरजा आणि आवश्यक गुंतवणूकीनंतर जी रक्कम शिल्लक राहते. त्या रकमेला सरप्लस फंड असे म्हणतात. तसेच ती रक्कम रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला देते.