कोरोना विषाणूपेक्षा डेल्टा प्लस व्हॅरिएंटचा धोका वाढला, यामुळे तीसरी लाट येण्याची शक्यता ?

कोरोना विषाणूनंतर जगभरात डेल्टा प्लसचे १४३ नमुने आढळले आहेत. यामध्ये यूके ४५, भारत ७, स्वित्झर्लंड २३, अमेरिका १२, पोर्तुगाल २१ आणि या व्यतिरिक्त नेपाळ, पोलंड, जपान, रूस, तुर्की, फ्रान्स आणि कॅनडामध्ये डेल्टा प्लसचं मोठ्या प्रमाणात संक्रमण आढळून आलं आहे.

    जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं असून डेल्टा व्हॅरिएंट प्लसने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. कोरोनाचं स्वरूप सतत बदलत आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं असून डबल म्यूटेंट म्हणजेच डेल्टा व्हॅरिएंटमध्ये अजून काही बदल होताना दिसत आहेत. डेल्टा व्हॅरिएंटचे काही रूग्ण महाराष्ट्रात सुद्धा सापडले आहेत. यामध्ये राज्यात एकूण सात नमुने आढळून आले आहेत.

    भारतासह अनेक देशात डेल्टा प्लसचा धोका वाढत आहे. यावर वेळीच आळा घातला नाही तर पुढच्या दोन-तीन आठवड्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डेल्टा प्लस व्हॅरिएंटनुसार कोरोनाची तिसरी लाटेचे नमुने आठ लाखापर्यंत पोहोचू शकतात आणि यामध्ये १० टक्के मुलांचा समावेश आहे.

    भारतात कोरोना व्हायरसेच डबल म्यूटेंट स्ट्रेन B.1.617.2 ला जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा असं नाव दिलं आहे. B.1.617.2 मध्ये एक आणि म्यूटेशन K417N  झालं आहे. जो याआधी कोरोना व्हायरसच्या बीटा आणि गामा व्हॅरिएंटमध्ये सुद्धा आढळला होता. नव्या म्यूटेशननंतर व्हॅरिएंटला डेल्टा प्लस व्हॅरिएंटला AY.1 या B.1.617.2.1 असं म्हटलं जात आहे.