प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

गेल्याच आठवड्यात आयएमडीने म्हटले होते की, सर्वसाधारण तारखेच्या एक दिवस आधीच ३१ मे ला केरळमध्ये मान्सून येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

    नवी दिल्ली : नैऋत्य मान्सून अंदमान-निकोबार द्वीप समूहांवर (Southwest Monsoon Andaman-Nicobar Islands) पोहोचला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी दिली. मान्सून लवकरच मुख्य भूभागांवर दाखल होणार असल्याचेच हे संकेत आहेत. २१ मे रोजी बंगालच्या खाडीतील दक्षिण भाग (Southern part of Bay of Bengal), निकोबार द्वीप समूह, संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात नैऋत्य मान्सून आला आहे.” अशी माहिती आयएमडीने दिली.

    गेल्याच आठवड्यात आयएमडीने म्हटले होते की, सर्वसाधारण तारखेच्या एक दिवस आधीच ३१ मे ला केरळमध्ये मान्सून येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

    ही हंगामी घटना चार महिन्यांच्या पावसाळ्याची सुरूवात चिन्हांकित करते. आयएमडीने यंदा सामान्य पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

    The southwest monsoon reaches the Andaman and Nicobar Islands