चोराने सोनसाखळी चोरण्यासाठी आठ महिन्यांच्या गर्भवतीला फरफटत नेले ; चेन्नईतील धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद

गीताचा पती रामचंद्रनने पल्लवरम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज सोमवारी व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींना आम्ही लगेच अटक करु, असं आश्वासन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलं आहे.

    चेन्नईत गर्भवतीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चोराने सोनसाखळी चोरण्यासाठी आठ महिन्यांच्या गर्भवतीला फरफटत नेले. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

    घरासमोरच घडली घटना

    पल्लवरम शहरातील रेणुका नगर भागात राहणारी २५ वर्षीय गीता आठ महिन्यांची गर्भवती आहे. शुक्रवारी सकाळी ती घरासमोर असलेल्या देवाची नेहमीप्रमाणे पूजा करत होती. ती डोळे बंद करुन देवाची प्रार्थना करत होती. त्याचवेळी दोघे दुचाकीस्वार मुख्य रस्त्यावर येऊन थांबले. दुचाकीवर मागे बसलेला तरुण तिच्याकडे गेला. गीता बेसावध अवस्थेत असतानाच त्याने तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. यांनतर गीताने प्रतिकार करत गळ्यातील चेन आणखी घट्ट पकडली. त्यामुळे दोघांमध्ये काहीशी झटापट झाली. तिचा प्रतिकार सुरुच असल्यामुळे हल्लेखोराने तिला खेचत रस्त्यापर्यंत नेले. या झटापटीत गीता खाली पडली, तरी त्याने तिला फरफटत नेले. अखेर तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्यात हल्लेखोर यशस्वी झाला. त्यानंतर दोन्ही दुचाकीस्वार आरोपींनी घटनास्थळावरुन पोबारा केला. या घटनेत गीताला दुखापत झाली आहे.

    गीताचा पती रामचंद्रनने पल्लवरम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज सोमवारी व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींना आम्ही लगेच अटक करु, असं आश्वासन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलं आहे.