देशातील कोरोना रुग्णसंख्येचा एकूण आकडा २ कोटी पार

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ लाख ५७ हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या २ कोटी २ लाख ८२ हजार ८३३ वर पोहोचली आहे.

    देशातील कोरोना रुग्णसंख्येचा एकूण आकडा २ कोटी पार झाला आहे. देशातील रोजच्या रुग्णसंख्येचा आकडा ४ लाखांवर गेला होता. आता हा आकडा काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ लाख ५७ हजार २२९ रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ हजार ४४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ लाख ५७ हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या २ कोटी २ लाख ८२ हजार ८३३ वर पोहोचली आहे.

    यातील १ कोटी ६६ लाख १३ हजार २९२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात ३४ लाख ४७ हजार १३३ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत ३ लाख २० हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.