Antibodies in patients

देशातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या ४७ लाखांच्या वर (Crosses the 47 lakh)  पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांत देशात १ हजार ११४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Deaths) झाला आहे.

संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रादुर्भाव मोठ्या संख्येने होत आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या ९४ हजार ३७४ रुग्णांची (Last 24 Hours New Corona Patient) भर पडली असून ही आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन वाढ आहे. देशातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या ४७ लाखांच्या वर (Crosses the 47 lakh)  पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांत देशात १ हजार ११४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Deaths) झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health )दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ९४ हजार ३७२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १ हजार ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ लाख ५४ हजार ३५७ झाली आहे. ९ लाख ७३ १७५ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच देशात आतापर्यंत ३७ लाख दोन हजार ५९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि दिल्लीसारख्या राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दहा लाखांच्या पुढे गेली आहे. देशभरात रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ७७.७७ टक्के असून मृत्युदर १.६ टक्के आहे.