देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २४ लाखांच्या उंबरठ्यावर

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना बाधितांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३८ इतकी झाली असून ६ लाख ५३ हजार ६२२ इतके पॉझिटिव्ह रूण सक्रिय आहेत. देशात आतापर्यंत १६ लाख ९५ हजार ९८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची एकूण संख्या ४७ हजार ०३३ इतकी आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता ब्रिटनला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

संपूर्ण देशात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत देशात ६६ हजार ९९९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ९४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३८ इतकी झाली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना बाधितांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३८ इतकी झाली असून ६ लाख ५३ हजार ६२२ इतके पॉझिटिव्ह रूण सक्रिय आहेत. देशात आतापर्यंत १६ लाख ९५ हजार ९८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची एकूण संख्या ४७ हजार ०३३ इतकी आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता ब्रिटनला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. 

दिलासादायक बाब म्हणजे, उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. वर्ल्डोमीचरच्या आकडेवारीनुसार, भारतात ४७ हजारांपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच  ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४६ हजार ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, संपूर्ण देशासह राज्यात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही देशातील कोरोना मृतांच्या आकड्यात वाढत होताना दिसत आहे.