राज्यात कोरोना विषाणूचा विळखा
राज्यात कोरोना विषाणूचा विळखा

आरोग्य मंत्रालयाने ( Ministry of Health ) दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ३३ लाख १० हजार २३५ वर पोहोचली आहे. तसेच यामध्ये ७ लाख २५ हजार ९९१ रुग्ण अक्टिव्ह आहेत. २५ लाख २३ हजार ७७२ कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार केले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ६० हजार ४७२ इतकी आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. तसेच कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशामध्ये ७५ हजार ७६० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. ( COVID19 case in the last 24 hours ) तर १ हजार २३ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३३ लाख १० हजारांच्या वर गेली आहे.

आरोग्य मंत्रालयाने ( Ministry of Health ) दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ३३ लाख १० हजार २३५ वर पोहोचली आहे. तसेच यामध्ये ७ लाख २५ हजार ९९१ रुग्ण अँक्टिव्ह आहेत. २५ लाख २३ हजार ७७२ कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार केले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ६० हजार ४७२ इतकी आहे.

दरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात २६ ऑगस्टपर्यंत ३ कोटी ८५ लाख ७६ हजार ५१० नमूने तपासण्यात आले आहेत. यामध्ये ९ लाख २४ हजार ९९८ नमून्यांची काल बुधवारी तपासणी झाली. तसेच देशात तब्बल ६७ हजार १५१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद बुधवारी करण्यात आली होती. मात्र आज कोरोना रूग्णांची संख्या पाहिली असता, देशात सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत.