देशातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ३० लाखांच्या पार

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाबाधितांची एकूण रूग्णसंख्या ३० लाख ४४ हजार ९४१ इतकी झाली आहे. तर ७ लाख ७ हजार ६६८ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये २२ लाख ८० हजार ५६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. परंतु देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा ५७ हजार ७०६ झाला आहे.

देशातील कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक विक्रमी वाढ होताना दिसत आहे. देशात मागील २४ तासांत ६९ हजार २३९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३० लाखांच्या पुढे गेली आहे. तर मागील २४ तासांत ९२१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाबाधितांची एकूण रूग्णसंख्या ३० लाख ४४ हजार ९४१ इतकी झाली आहे. तर ७ लाख ७ हजार ६६८ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये २२ लाख ८० हजार ५६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. परंतु देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा ५७ हजार ७०६ झाला आहे. भारतात कोरोना चाचण्यांचा महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला असून गेल्या २४ तासांमध्ये १० लाखांहून अधिक चाचण्या केल्या गेल्या आहेत.


देशभरात आत्तापर्यंत ३.४४ कोटी चाचण्या झाल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार १० ते १६ ऑगस्ट या कालावधीत भारतातील रुग्णवाढ ४.३६ लाख इतकी होती. देशात कोरोना रुग्णांची संख्या ३० लाखांच्या वर गेली असून, अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत हा तिसरा देश आहे. तिन्ही देशांमधील रुग्णसंख्या वाढीची तुलना केली तर अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा भारतात रुग्णवाढीचा वेग जास्त असल्याचं मानलं जात आहे.