teacher

शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची (TET Certificate Validity Period Extended) वैधता आता अमर्याद कालावधीसाठी वाढवण्यात आली आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या शिक्षकांना फायदा होणार आहे.

  शिक्षक(Teacher) होण्यासाठी प्रयत्न करत असलेल्यांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची (TET Certificate Validity Period Extended) वैधता आता अमर्याद कालावधीसाठी वाढवण्यात आली आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या शिक्षकांना फायदा होणार आहे.

  याआधी या प्रमाणपत्राची वैधता ७ वर्षांसाठी होती. या कालावधीत शिक्षकाची नोकरी लागली नाही तर इच्छुकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागत होती. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय बदलत प्रमाणपत्राची वैधता अमर्याद कालावधीसाठी वाढवली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ही घोषणा केली आहे.


  पूर्वलक्षी प्रभावासह २०११ या वर्षांपासून हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी २०११पासूनचे उमेदवार ग्राह्य धरले जातील. शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना या निर्णयामुळे रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होईल, असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल म्हणाले.

  फास्ट फूडची क्रेज कमी करण्यासाठी आता पालकांनीच पौष्टिक आहाराचा आग्रह धरायला हवा तरच येणारी पिढी सशक्त असेल, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...

  ज्या उमेदवाराचे शिक्षक पात्रता प्रमाणपत्र २०११ या वर्षानंतर बाद झालं आहे. अशा सर्व उमेदवारांना नव्याने प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.