आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं चित्रं ज्या पद्धतीने दाखवलं जात आहे त्याने भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचे षडयंत्र ; संजय राऊतांचा दावा

भारताचं सामाजिक स्वास्थ आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे षडयंत्रं असू शकतं. त्याविरोधात आपण सर्वांनी एकत्रं येऊन लढलं पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

    मुंबई: आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे याबाबत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गंभीर दावा केला आहे. देशाचं जे चित्र उभं केलं जातंय त्यावरून हे फार मोठं षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे मोठं षडयंत्र असू शकतं, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

    काय म्हणाले राऊत ?
    आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील कोणत्याही व्यक्तीचा किंवा देशाचा अपमान होत असेल तर ते योग्य नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर सर्वांनी मतभेद विसरून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठी उभं राहिलं पाहिजे. मोदी जे धोरण बनवतील त्याच्यामागे उभं राहिलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.विदेशी सोशल मीडिया, विदेशी मीडियात भारताचं चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. त्यातून भारताचं सामाजिक स्वास्थ आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे षडयंत्रं असू शकतं. त्याविरोधात आपण सर्वांनी एकत्रं येऊन लढलं पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.