आशियातील दुसरी सर्वात मोठी श्रीमंत व्यक्ती, गौतम अदानी यांच्या संपत्तीत दर तासाला होतेय वाढ, जाणून घ्या त्यांचा काय आहे नेटवर्थ ?

अदानी ग्रूप यांच्या कंपनीने व्यवसायात अधिकाधिक उत्पन्न निर्माण व्हावेत, यासाठी नवीन कल्पना त्यांनी मांडली. अदानी ग्रुपच्या लिस्टेड कंपन्यांचे शेअर्सने मोेठ्या प्रमाणात उच्चांकी घेतली होती. अदानी ग्रूप यांच्या सहा कंपन्या सध्या मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. 

    मागील आठवड्यात गौतम अदानी हे आशियातील सर्वात दुसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स यांच्या माहितीनुसार, त्यांनी चीनच्या झोंग शैनशैनला मागे टाकलं आहे. २३ मे २०२१ ला अदानी यांची एकूण संपत्ती ५.३ लाख कोटींच्या वरती गेली आहे. कोरोना संकटाच्या काळातही २०२१ मध्ये १४२ दिवसांत जवळपास २ कोटी ५६ लाखांच्या वर गेली आहे. अदानी यांनी या वर्षातील प्रत्येक तासांत ७५ कोटी रूपयांपेक्षा जास्त पैसे कमावले आहेत. एक वर्षाआधी एप्रिल २०२० मध्ये गौतम अदानी यांची नेटवर्थ ६४. ८९ हजार कोटी रूपये इतकी होती.

    अदानी यांनी व्यवसायात मागील एका वर्षात इतका पैसा कमावला कसा?

    अदानी ग्रूप यांच्या कंपनीने व्यवसायात अधिकाधिक उत्पन्न निर्माण व्हावेत, यासाठी नवीन कल्पना त्यांनी मांडली. अदानी ग्रुपच्या लिस्टेड कंपन्यांचे शेअर्सने मोेठ्या प्रमाणात उच्चांकी घेतली होती. अदानी ग्रूप यांच्या सहा कंपन्या सध्या मार्केटमध्ये लिस्टेड आहेत.

    मे २०२० मध्ये कंपनीचा शेअर मार्केट १.४५ लाख कोटी इतका होता. आता तो वाढला असून यामध्ये जवळपास ८.३७ लाख कोटींच्या वर गेला आहे. मागील एका वर्षात अदानी ग्रूपने ६ पटीने मार्केट कॅप्चर केलं आहे.  अदानी यांनी जास्तकरून अशा प्रकारच्या व्यवसायाची निवड केली आहे, ज्या कंपन्यांना सरकार जास्त प्रमाणात सपोर्ट करत आहे आणि यामध्ये स्पर्धा सुद्धा कमी प्रमाणात आहे. नेशन बिल्डिंग स्ट्रॅटेजीनुसार अदानी आपली कामे करतात.