तुमचे ‘अहो’ पगार किती हे सांगत नसतील तर बायकांनो द्या माहिती अधिकाराची धमकी

नवरा (Husband) आपल्या बायकोला (Wife) नेमका पगार (Payment) किती आहे, हे मुळात सांगतचं नाही. त्यामुळे नवऱ्याचा पगार जाणून घेण्यासाठी बायकोची नेमही धडपड सुरू असते. परंतु आता अनेक महिलांनी थेट सरकारदरबारी गाऱ्हाणे मांडल्याचे दिेसून आले आहे. तसेच केंद्रीय मंत्री आयोगाकडे (Union Ministry Commission) देखील पत्र (Letter) पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात नवऱ्याला आपला पगार किती आहे, या सर्व गोष्टीची संपूर्ण माहिती बायकोला मिळणार आहे.

आपल्या नवऱ्याचे इतर महिलेसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. त्यामुळे तो पगाराचा अधिक हिस्सा तिच्यावर खर्च करीत असून परिणामी आपल्या नवऱयाचा नेमका पगार किती आहे, अशा आशयाची अनेक पत्रे सध्या माहिती आयोगाकडे प्राप्त झाली आहेत. यासंदर्भात सध्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अर्ज करणाऱ्यांचा विचार करीत वैयक्तिक माहिती देण्याचा विचार करीत असल्याचं सांगितलं जात आहे.