वाहन चालकांसाठी नव्या वर्षात लागू होणार ‘हा’ नियम

मंत्रालयाच्या नवीन नियमानुसार, पुढील वर्षी जानेवारीपासून ज्या वाहनांचे रजिस्ट्रेशन १ डिसेंबर २०१७ च्या अगोदर झाले आहे. त्या गाड्यांमध्ये सुद्धा फास्टॅग लावणे अनिवार्य होईल. तसेच याशिवाय मंत्रालयाने एप्रिल २०२१ पासून थर्ड पार्टी विमा अधिक प्रभावी बनवण्यासाठी फास्टॅग अनिवार्य बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

नवी दिल्ली: देशभरात राष्ट्रीय राज्यमार्गावर १ डिसेंबर २०१९ पासून सर्व खासगी आणि सरकारी वाहनांसाठी रस्ते, परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने फास्टॅग बनवला होता. आता परिवहन मंत्रालयाने डिसेंबर २०१७ पूर्वी विकण्यात आलेल्या वाहनांमध्ये फास्टॅग अनिवार्य करण्यासाठी मसूदा अधिसूचना जारी केली आहे. तसेच ही अधिसूचना जानेवारी २०२१ पासून प्रभावी होणार आहे.

मंत्रालयाच्या नवीन नियमानुसार, पुढील वर्षी जानेवारीपासून ज्या वाहनांचे रजिस्ट्रेशन १ डिसेंबर २०१७ च्या अगोदर झाले आहे. त्या गाड्यांमध्ये सुद्धा फास्टॅग लावणे अनिवार्य होईल. तसेच याशिवाय मंत्रालयाने एप्रिल २०२१ पासून थर्ड पार्टी विमा अधिक प्रभावी बनवण्यासाठी फास्टॅग अनिवार्य बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच यासंबंधी रस्ते परिवाहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने नोटिफिकेशन जारी केले आहे.

केंद्रीय मोटर वाहन कायदा, १९८९ च्या अनुसार २०१७ पासून फास्टॉग नव्या चारचाकी वाहनांच्या सर्व नोंदणीसाठी अनिवार्य केले आहेत. आणि वाहन उत्पादक किंवा त्यांच्या डिलर्सद्वारे पूर्तता केली गेली पाहीजे. तसेच १ डिसेंबर २०१७ च्या पूर्वी विकली गेलेली जुनी वाहने म्हणजे एम आणि एन श्रेणीच्या चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव सीएमव्हीआर, १९८९ मध्ये दुरूस्तीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. असे मंत्रालयाने म्हटले आहे.