पंतप्रधानांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक ; महाराष्ट्रातून नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

पंतप्रधानांच्या निवासस्थानी सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार असून, या बैठकीला भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह इतर महत्त्वाचे मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

    उत्तर प्रदेशसह पाच महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभा निवडणुका होत असून, त्यानुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महत्त्वाचे मंत्री आणि भाजपा नेत्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार असून, याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांच्यासह इतर नेत्यांना स्थान दिलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर इतर नेत्यांचीही नावे चर्चेत आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार असून, या बैठकीला भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह इतर महत्त्वाचे मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

    महाराष्ट्रातून  मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांची वर्णी लागणार असल्याची दाट शक्यता आहे. त्याबरोबर हिना गावित यांच्या नावाचीही चर्चा आहे. देवेंद्र फडणवीसांनाही केंद्रात घेणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, सध्या तरी हे चर्चेतच आहे.