पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत मोठी बातमी, जाणून घ्या काय आहेत आजचे दर ?

देशाच्या राजधानीसह सर्वच मोठ्या शहरांमध्ये दर स्थिर आहेत. शुक्रवारी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ९१.१७ तर डिझलची किंमत (Diesel Prices) ८१.४७ रुपये प्रतिलिटर इतकी होती.

  नवी दिल्ली: इंधन कंपन्यांकडून सलग तेराव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये बदल केला गेला नाही. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol and Diesel Prices) स्थिर आहेत. यामुळे देशातील सामान्य जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. २७ फेब्रुवारीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल झालेला नाही.

  रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये (Petrol Diesel Price) बदल होत असतात. सकाळी ६ वाजतापासूनच नवीन दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडून किंमत जवळपास दुप्पट होते. विदेशी चलनासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किमतीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतात.

  पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

  दिल्लीमध्ये पेट्रोल ९१.१७ आणि डिझेल ८१.४७ प्रति लीटर

  मुंबईमध्ये पेट्रोल ९७.५७ आणि डिझेल ८८.६० प्रति लीटर

  कोलकातामध्ये पेट्रोल ९१.५३ आणि डिझेल ८४.३५ प्रति लीटर

  चेन्नईमध्ये पेट्रोल ९१.११ आणि डिझेल ८६.४५ प्रति लीटर