corona third wave

ब्रिटन सरकारनं या नव्या अवताराचा प्रसार अधिक वेगानं होत असल्याने १६ डिसेंबरपासून लॉकडाऊन घोषित केला आहे. भारतातही लोक आता नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. यामुळे कोरोना उद्रेकाची शक्यता आहे. हेच विचारात घेऊन भारतातील अनेक राज्यांनी नवे नियम लागू(new rules in state) केले आहेत. 

कोरोनाची(corona) परिस्थिती सुधारत आहे , असे वाटत असताना कोरोनाच्या नव्या प्रकाराने डोकं वर काढलं आहे.  ब्रिटनमध्ये हे कोरोनाचं नवं म्युटेशन सापडलं आहे. ब्रिटन सरकारनं या नव्या अवताराचा प्रसार अधिक वेगानं होत असल्याने १६ डिसेंबरपासून लॉकडाऊन घोषित केला आहे. भारतातही लोक आता नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. यामुळे कोरोना उद्रेकाची शक्यता आहे. हेच विचारात घेऊन भारतातील अनेक राज्यांनी नवे नियम लागू(new rules in state) केले आहेत.

विविध राज्यांमधील नियम

महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्य सरकारने नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५ जानेवारीपर्यंत हा नियम लागू राहील.

कर्नाटक – कर्नाटक राज्य सरकारने डेन्मार्क आणि युकेवरुन आलेल्या नागरिकांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे.

दिल्ली – दिल्ली सरकारने अजुन कोणतेही निर्बंध घातले नसले तरी लवकरच निर्बंध जाहीर होण्याची शक्यता आहे.

पंजाब – पंजाबमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

केरळ – केरळमध्ये अद्याप कोणतेही नवे नियम लागू करण्यात आले नाहीत.

तामिळनाडू – तामिळनाडूमध्ये एक परदेशी प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. अद्याप नवे निर्बंध लागू नाहीत. पण ते जाहीर होण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगाल – गेल्या १५ दिवसांमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांची तपासणी होणार आहे.

तेलंगणा – तेलंगणा सरकार प्रवाशांची आरटी – पीसीआर टेस्ट करत आहे. काही अलीकडेच तेलंगणामध्ये आलेल्या प्रवाशांची यादी बनवण्याचं काम सुरू आहे.